लोकसभेच्या रिंगणात श्रीमंत उमेदवार
निवडणुक व्यवस्थेत प्रत्येक उमेदवाराला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या संपत्तीची माहिती निवडणूक आयोगाला देणे अनिवार्य आहे. यावरून उमेद्वाराबाबत स्पष्टता आणि त्याच्या संपत्तीबाबत मतदारांना माहिती मिळते. आता २० मे रोजी मतदानाच्या पाचव्या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार झाशी मतदार संघातून भाजपचे अनुराग शर्मा उभे आहेत तर या यादीत उत्तर मुंबईतील भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचाही समावेश आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालानुसार, अनुराग शर्मा टॉप-5 श्रीमंत उमेदवारांमध्ये पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्यासमोर काँग्रेसचे प्रदीप जैन आदित्य आहेत, ज्यांची सुमारे तीन कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तसेच उत्तर मुंबई (महाराष्ट्र) मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पियुष गोयल या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून उत्तर मुंबईतून पियुष गोयल यांच्या विरोधात काँग्रेसचे भूषण पाटील निवडणूक लढवत आहेत.
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये नशीब आजमावणारे ५ श्रीमंत उमेदवार कोण आहेत जाणून घेऊया…
क्रमांक | उमेदवारांची नावे | मतदार संघ | पक्ष | संपत्ती |
१ | अनुराग शर्मा | झाशी (उत्तर प्रदेश) | बीजेपी | २१२ कोटी |
२ | निलेश भगवान सांबरे | भिवंडी (महाराष्ट्र) | अपक्ष | ११६ कोटी |
३ | पियुष गोयल | मुंबई उत्तर (महाराष्ट्र) | भाजप | ११० कोटी |
४ | सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ बाळ्या मामा | भिवंडी (महाराष्ट्र) | राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार | १०७ कोटी |
५ | कृष्णा नंद त्रिपाठी | चत्रा (झारखंड) | काँग्रेस | ७० कोटी |