प्रतिनिधी, मुंबई : माथेरानच्या मिनी ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता जूनपासून ऐतिहासिक इंजिनच्या साथीने प्रवास करता येणार आहे. मिनी ट्रेनच्या इंजिनला वाफेच्या इंजिनचे रूपडे देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. याचे काम परळच्या रेल्वे कार्यशाळेत सुरू आहे.महामुंबई-पुण्यापासून जवळचे थंड हवेचे पर्यटनस्थळ अशी माथेरानची ओळख आहे. येथेच मिनी ट्रेनचीही सुविधा आहे. यामुळे थंड हवेचे ठिकाण आणि मिनी ट्रेनची सफर यामुळे माथेरानमध्ये पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. मिनी ट्रेनच्या डिझेल इंजिनला वाफेच्या इंजिनचे रूप देण्याचे काम परळच्या रेल्वे कार्यशाळेत सुरू आहे. वाफेच्या इंजिनचे सुट्टे भाग एकत्र करून त्याची जोडणी नेरळमध्ये करण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी सांगितले.
१९८२-८३च्या सुमारास माथेरान लाईट रेल्वेवरील (एमएलआर) नियमित स्टीम इंजिन सेवा बंद झाली. नोव्हेंबर २०११मध्ये माथेरानच्या टेकड्यांवर शेवटचे वाफेचे इंजिन दिसले होते. पर्यटकांना आजही वाफेच्या इंजिनचे आकर्षण आहे. हे इंजिन कोळशावर धावत असल्याने त्यातून वाफ बाहेर पडत असे. इंजिनचा आवाज त्याची शिट्टी या सर्वच गोष्टींमुळे त्याचे विशेषत्व होते. कालातंराने वाफेच्या इंजिनची जागा डिझेल इंजिनने घेतली. आता याच डिझेल इंजिनला वाफेच्या इंजिनचे रूप देण्यात येत आहे.

हिरवी-लाल रंगसंगती
वाफेच्या इंजिनचे रूप देण्यासाठी हिरव्या आणि लाल रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आधुनिक पद्धतीच्या पॉलियूरेथेनच्या रंगाचा मुलामा देण्यात येत आहे. यामुळे इंजिन टिकाऊ आणि आकर्षक दिसण्यास मदत होते. डिझेल इंजिनच्या माध्यमातून वाफेच्या इंजिनमधून प्रवास करण्याचा अनुभव प्रवासी-पर्यटकांना घेता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे, असेही नीला यांनी सांगितले.