मुंबई : मुलुंड येथे काल रात्री भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते यांच्यामध्ये झालेल्या वादाप्रकरणी मुलुंड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडे हल्ला करणाऱ्या लोकांनी खोटी तक्रार दाखल केली, या आरोपवरुन गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या खाजगी कार्यालयातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोटेचा यांच्या ऑफिसवर हल्ला केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री मुलुंड परिसरातील राजकीय वातावरण तापल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी त्या ठिकाणी भेट दिली.
दरम्यान, या प्रकरणात कलम 353, 332, 341,143, 147, 149 अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. 15 गुंडांच्या माध्यमातून हल्ला केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तिघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर लोकांचा पोलीस शोध घेत आहेत.
महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कोटेचांच्या ऑफिसवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. “ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हल्ला केला. संजय दिना पाटील यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. परंतु असा हल्ला सहन केला जाणार नाही. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
या घटनेनंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दानवेंनी या प्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप केला होता. तसेच पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी गृहमंत्री आले होते, असा दावाही अंबादास दानवेंनी केला होता.