Narendra Modi in Shivaji Park: शिवाजी पार्कवर मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका; माझ्याकडे १० वर्षाचा रिपोर्ट कार्ड आणि २५ वर्षांचा…

मुंबई: शिवाजी पार्कवरील महायुतीच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियावर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांची सत्ता असताना असलेल्या पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरील भाषणे काढून बघा, त्याच फक्त गरिबीचा उल्लेख आहे. पण आम्ही गेल्या १० वर्षात लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचे मोदींनी सांगितले.

मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या मैदानावर झालेल्या या सभेत बोलताना मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. मी तुम्हाला विकसीत भारत देऊन जाणार आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी २४ तास २०४७ सालचा विकसीत भारताचे लक्ष्य पुढे ठेवून काम करत आहे.

भारताला स्वतंत्र्य मिळाले तेव्हा हा देश जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. जेव्हा २०१४ साली आमच्या कडे सत्ता आली तेव्हा या लोकांनी ही अर्थव्यवस्था ११व्या क्रमांकावर नेऊन ठेवली होती. आज १० वर्षानंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. देशाला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींजींच्या सूचनेनुसार काँग्रेस वेळीच भंग केली असती तर आज देश पाच दशकं पुढे गेला असता.