मुंबई: मुंबईतील घाटकोपर होल्डींग कोसळल्याप्रकरणी मुख्य आरोपी भावेश भिंडे याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. भावेश भिंडे याला उदयपूर येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा भावेशला मुंबईत आणत आहे. भावेशला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. भिंडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भिंडे गायब झाला होता. गुंगारा देणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी उदयपूर येथील एका हॉटेलमधून ताब्यात घेतले.
पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर येथील पेट्रोल पंपाच्या बाजूला इगो मीडिया कंपनीच्या वतीने लावण्यात आलेला भलामोठा होर्डिंग सोमवारी कोसळला. दुर्घटनेत १६ जणांचा नाहक बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी इगो कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्यासह या कंपनीचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदार यांच्यावर पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर भिंडे याचा मोबाइल बंद करून तो पसार झाला होता. पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती.मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ९ च्या पथकाला भावेश उदयपूर येथील एका हॉटेलमध्ये सापडला. इगो मीडिया कंपनीचे अनेक होर्डिंग्स मुंबईत असून अनेक ठिकाणी त्याने नियमांचे उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे त्याच्या कंपनीवर मुंबई महानगर पालिका कायदा अंतर्गत २१ गुन्ह्यांची नोंद आहे. राजकीय नेत्यांशी जवळीक असलेल्या भिडे याच्यावर जानेवारी महिन्यात मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात भिडे जामिनावर असून पोलिसांनी या गुन्ह्यात आरोपपत्र देखील दाखल केले आहे. भिंडे याने मुलुंड परिसरातून विधानसभेची निवडणूकही लढवली होती.

दरम्यान इगो कंपनीचा मालक भावेश भिंडे याला यापूर्वीही बेकायदा होर्डिंग्ज लावल्याप्रकरणी अनेकवेळा दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर भावेश भिंडे याच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, नंतर भिडे याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. मात्र आता घाटकोपर घटनेत त्याचा शोध घेऊन अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.