पुणे(बारामती) : बारामतीतील ईव्हीएम मशीन ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवल्या होत्या. तेथील सीसीटीव्ही कॅमेरे काही काळ बंद असल्याची तक्रार शरद पवार गटाकडून करण्यात आली होती. या प्रश्नावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले की, ”ही खूप गंभीर गोष्ट आहे. अगोदरच ईव्हीएमबाबत लोक शंका करत आहेत. याबाबत निवडणूक आयोगाने आणि त्यांच्या यंत्रणेने अधिकची काळजी घेतली पाहिजे होती. एक तास सीसीटीव्ही कॅमेरे बंद असणे, हे खूप गंभीर व चुकीचे आहे”, अशी प्रतिक्रिया युगेंद्र पवार यांनी दिली.बारामती लोकसभा मतदारसंघाचे मतदान पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज शरदचंद्र पवार पक्ष कार्याला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. शेकडो नागरिकांनी युगेंद्र पवार यांची भेट घेत निवेदने सादर केली. दरम्यान त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. ”प्रचारादरम्यान नागरिकांनी आम्हाला ज्या समस्या सांगितल्या आहेत. त्या सोडवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचे ऍडमिशन, नोकरी संदर्भातील कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पक्षाकडून सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय मदत कक्षाविषयी विचारले असता ते म्हणाले की, ”वैद्यकीय मदत कक्ष चांगल्या प्रकारे काम करत आहे. मदत कक्ष सुरू केल्यापासून २० लाखापर्यंतची आतापर्यंत मदत केली आहे. नागरिकांच्या ज्या काही वैद्यकीय समस्या असतील त्या सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत”. राजकारणात उतरणार का?, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, ”आपण अनेकदा हा प्रश्न केला आहे. मीही अनेकदा नाही असं सांगितलं आहे”, असंही ते यावेळी म्हणाले.

निवडणुकीनंतर माझ्या कुटुंबातील सदस्य परदेशी दौऱ्यावर जातील, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. याबाबत विचारले असता युगेंद्र पवार म्हणाले की, ”मी बारामतीतच आहे आणि इतरांनाही कुणाला परदेशात जायचं असेल तर, त्यात गैर आणि चुकीचं काही नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली