फिट राहण्यासाठी वेगवेगळे फंडे आणि ट्रेंड्स नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी intermittent fasting, कधी १० हजार स्टेप्स चॅलेंज, तर आता नवा फंडा चर्चेत आलाय ‘6-6-6 Walking Rule’! नाव जरी थोडं गोंधळात टाकणारं असलं, तरी हा नियम खूप सोपा आहे आणि अनेक जण याचा वापर फिटनेससाठी करत आहेत.
नेमकं काय आहे हा ‘6-6-6 वॉकिंग’ नियम?
पहिलं 6 म्हणजे : सकाळी 6 वाजता उठून चालायला जायचं.
दुसरा 6 म्हणजे : दररोज 6 किलोमीटर अंतर चालायचं.
तिसरा 6 म्हणजे : आठवड्यातून 6 दिवस हे पाळायचं!
हे नियम फॉलो करण्याचे फायदे –
वजन कमी करण्यास मदत: दररोज ६ किलोमीटर चालल्याने शरीरातील कॅलोरीज बर्न होतात आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते: चालणं हा एक सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम आहे, ज्यामुळे हार्ट मजबूत होतं.
डायबिटीज आणि बीपीवर नियंत्रण: चालण्याने रक्तातील साखर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणं शक्य होतं.
मानसिक तणाव कमी होतो: सकाळी चालल्यानं फक्त शरीर नव्हे, तर मनही फ्रेश होतं आणि मूड सकारात्मक राहतो.
पण प्रत्येकासाठी हा नियम योग्य असेलच असं नाही!
हा नियम फॉलो करण्याचे तोटे –
अतिव्यायामाचा धोका: एकदम ६ किलोमीटर चालणं सुरुवातीला शरीरावर ताण आणू शकतं.
सांधेदुखीचा त्रास: चुकीची चालण्याची पद्धत किंवा चुकीचे शूज वापरल्यास गुडघे व घोटे दुखू शकतात.
हृदयविकार किंवा सांध्यांचे आजार असणाऱ्यांसाठी धोकादायक: अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच चालण्याचा प्लॅन ठरवावा.
मग कोणासाठी हा फंडा योग्य?
1. ज्यांना चालायची सवय आहे आणि फिटनेस राखण्याची इच्छा आहे.
2. ज्यांचं वजन कमी करायचं आहे आणि एक ठरावीक रूटीन हवं आहे.
3. ज्यांच्याकडे रोज सकाळी वेळ आहे आणि चालणं आवडतं.
आणि कोणी टाळावं?
ज्यांना सांध्यांचे दुखणे, हृदयविकार किंवा वजन खूप जास्त आहे, त्यांनी हळूहळू सुरुवात करावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.