230 हून अधिक जागांचे कल हाती, महायुती सुस्साट; महाविकास आघाडीचा आकडा काय?

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे. 20 नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर आता आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पोस्टल मतांची मोजणी सध्या केली जात आहे. महायुती 123 तर महाविकास आघाडीचे 100 उमेदवार आघाडीवर आहेत. तर इतर 11 उमेदवार आघाडीवर आहेत.  सोलापूर दक्षिणमधून पोस्टल मतमोजणीत भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर आहेत. भाजपचे सुभाष देशमुख आघाडीवर तर ठाकरे गटाचे अमर पाटील पिछाडीवर आहेत. शिर्डीत भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील पहिल्या फेरीत 2300 मतांनी आघाडीवर आहेत.

कागलमध्ये टपाली मतांमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ आघाडीवर आहेत. राधानगरी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आबिटकर आघाडीवर आहेत. शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीवर आहे. इचलकरंजी मध्ये राहुल आवाडे आघाडीवर आहेत. शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात विनय कोरे आघाडीवर आहेत. कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील आघाडीवर आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात पहिली फेरीत जन स्वराज्य पक्षाचे उमेदवार अशोकराव माने 5006 मतांनी आघाडीवर आहेत. सातारा शहर मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे अमित कदम आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात सामना होतोय.

पुण्यातील वडगाव शेरीतून सुनील टिंगरे आघाडीवर आहेत. वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातून सुनील टिंगरे 800 मतांनी आघाडीवर आहेत.कसबा मतदासंघातून हेमंत रासने आघाडीवर आहेत. हडपसर मतदासंघातून चेतन तुपे आघाडीवर आहेत. कोथरूडमधून चंद्रकांत पाटील आघाडीवर आहेत.

धुळे जिल्ह्यातील पाचही मतदार सांगा पैकी चार मतदार संघात भाजपाची मुसंडी मारली आहे. धुळे शहरात भाजपचे अनुप अग्रवाल,
शिरपूरमध्ये भाजपचे काशीराम पावरा आघाडीवर तर धुळे ग्रामीण मध्ये भाजपाचे राम भदाणे आघाडीवर शिंदखेडा मतदारसंघात भाजपाचे विजयकुमार रावळ आघाडीवर आहेत.

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील टपाल मतपत्रिका मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील टपाल मतपत्रिका मतमोजणीला सुरुवात झाली आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील टपाल मतपत्रिका मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातील टपाल मतपत्रिका मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)