ह्रदयद्रावक घटना! उंड्रीत जलाशयात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू; पोहता येत नसतानाही मारली उडी

प्रतिनिधी, हडपसर : उंड्री येथील पोखराई जलाशयामध्ये तेरा वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली. दुपारी दीडच्या सुमारास सहा मित्र जलाशयात पोहण्यासाठी गेले होते. मित्र पोहत असल्याचे पाहून त्यानेही जलाशयात उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने तो बुडाला. ते पाहून मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र काहीही उपयोग झाला नाही.

काय घडलं?
अग्निशनशामक दलाच्या जवानांनी बुधवारी रात्री उशिरापर्यंत पाणबुडीच्या मदतीने मुलाचा शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. गुरुवारी सकाळी जवानांनी पुन्हा शोध घेतला असता, मुलाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Pune News : चिमुकला खेळताना शिकाऊ कारचालकाने अचानक गाडी वळवली, एकुलता एक लेक गेला, कुटुंबावर शोककळा
ओंकार रविशंकर गौतम (वय १३ रा. उंड्री गावठाण) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलगा पाच मित्रांसह बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास उंड्रीतील पोखराई जलाशयात पोहण्यासाठी गेला. जलाशय दहा फूट खोल आहे.
ओंकारला पोहायला येत नव्हते. तरीही मित्रांचे पाहून त्याने उडी मारली. मात्र, पोहता येत नसल्याने तो बुडाला. ओंकार उंड्री गावठाणातील शाळेत इयत्ता सातवीत शिकत होता. त्याचे आई-वडील बांधकाम मजूर आहेत.