रापुणे: बारामतीमधील पवार विरुद्ध पवार संघर्षाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं असताना मतदारसंघात लक्षवेधी घडामोडी सुरु आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत असलेल्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी पोहोचल्या आहेत. मतदान सुरु असताना सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्यानं चर्चांना उधाण आहे. सुळे अजित पवारांच्या घरी पोहोचल्या, त्यावेळी अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री घरी असल्याचं समजतं. तर अजित पवारांच्या पत्नी आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार घरी नव्हत्या. त्या मतदारसंघात असल्याचं कळतं.
सुप्रिया सुळे मतदान सुरु असताना अजित पवारांच्या घरी; चर्चांना उधाण, या भेटीमागे दडलंय का?
