पुणे: पुण्यात आज राष्ट्रवादी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. यावेळी अजित पवार गट आणि शरद पवार गट आमनेसामने आले होते. या बैठकीसाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी उपस्थिती लावली होती. शरद पवार आणि अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनीही उपस्थिती लावली होती. बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा नियोजित समितीची बैठक आज होत आहे. पुणे जिल्ह्यातील प्रश्नांसंदर्भात शरद पवार आढावा घेत असल्याचे रविंद्र धंगेकर म्हणाले. त्यानंतर अजित पवारांना घेरल्याचे पहायला मिळाले.
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी पालकमंत्री अजित पवारांना पाणी प्रश्नावर घेरल्याचे चित्र पहायला मिळाले. दूषित पाण्यावर काय उपाय योजना केली जाणार, अशी विचारणा अजितदादांना करण्यात आली. अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांना उत्तर देणे टाळलं. तर शरद पवारांच्या कारखान्याच्या प्रश्नावर नोटीस दिल्याची माहिती दिली. शिरूर आणि बारामतीला निधी मिळत नसल्याची तक्रार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंकडे विचारणा केली. यावर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी ह्या प्रश्नांचा मुद्दा उपस्थित करत पालकमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाली.त्यानंतर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार यांनी एक धक्कादायक खुलासा केला. समितीच्या बैठकीत आमदार खासदार हे फक्त निमंत्रित सदस्य आहेत. त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा, प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही, असं अजित पवार म्हणाले. यानंतर वातावरण तापल्याचे पहायला मिळाले. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत फक्त समितीचे निवडून आलेले सदस्य त्यांचे प्रश्न त्यांची बाजू त्यांचे मुद्दे मांडू शकतात. पण इतके वर्ष मी पालकमंत्री होतो. जिल्हा परिषद ताब्यात होती म्हणून मी आमदार खासदारांना काही बोललो नाही. पण नियमानुसार आमदार खासदार यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही, असं अजितदादा म्हणाले आहेत

आजच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि महायुतीचेही काही आमदार प्रश्न, मुद्दे आणि त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडत होते. त्यावर अजित पवार यांनी केलेलं हे वक्तव्य धक्कादायक मानलं जात आहे. त्यामुळे आता बैठकीत शरद पवार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित करताच त्यांना शह देण्याचा अजित पवारांचा प्रयत्न नाही ना अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.