मुंबईत काही तासात मुसळधार पाऊस कोसळणार
आजही मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. तर, येत्या काही तासात मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर, पुढील ५ दिवस कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागांना पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे, कोल्हापुरात अतिमुसळधार पाऊस
मुंबई-ठाणे, पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूरमध्ये हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, विदर्भातही पावसाची शक्यता आहे. येथील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्याच्या काही भाग वगळता इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसेल.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावासाच ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस (५ ते १० जुलै) हे पावसाचे असेल. यापार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्याला पावासाच ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, पालघरसह कोकणातही जोरदार पाऊस कोसळेल. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे.