सांगलीत विशाल पाटलांचं बळ वाढलं! ३१ माजी नगरसेवकांचा पाठिंबा, परिषद घेत भूमिका सांगितली

सांगली: जतमधील आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप ह्या ३१ माजी नगरसेवकांनी संयुक्तरीता पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी बोलताना नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर म्हणाल्या की, दहा वर्षात खासदार संजयकाका पाटील यांनी जत शहराला निधी दिला नाही. त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे.
नरेश म्हस्केंच्या उमेदवारीवरुन भाजपमध्ये नाराजी, पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, अडचणी वाढण्याची शक्यता
माजी नगरसेवक निलेश बामणे म्हणाले की, आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत शहरासाठी निधी आणला. मात्र खासदार संजयकाका पाटील यांनी शुद्धीपत्रक करून तोच निधी दिला. दहा वर्षात जत शहराला त्यांनी निधी दिला नाही. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आमचा सर्व नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे माजी नगरसेवक निलेश बामणे म्हणाले. तर भाजपचे शहर अध्यक्ष अण्णा भिसे म्हणाले की, आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी बंड पुकारला असून त्यांचा आदेश म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत आहोत.माजी नगरसेवक परशुराम मोरे म्हणाले, जिल्ह्याचा विकास फक्त विशाल पाटील करू शकतात. त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. माजी नगरसेवक गौतम ऐवाळे म्हणाले की, आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांच्या सांगण्यावरून आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयासाठी आम्ही ३१ माजी नगरसेवक त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना जत शहरात मोठ्या मताधिक्य देऊ असे इरण्णा निडोणी म्हणाले.

अख्खं घराणं एका बाजूला असताना एकटा माणूस जिंकून आला; अजित दादांनी पवारांचाच इतिहास सांगितला

जत शहरात भीषण पाण्याची अवस्था असून जर शहराला पाणीपुरवठा करणारे ७८ कोटी नळ पाणीपुरवठा तांत्रिक बाबीत अडकले आहे. मात्र खासदार संजय काका पाटील यांनी यासाठी कोणताही प्रयत्न केले नाही. त्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पापा कुंभार म्हणाले. आम्ही सर्व ३१ माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा जोमाने प्रचार करू, असं युवा नेते संतोष मोठे यांनी सांगितलं.