सरसकट फ्री रेशन बंद करा, फक्त त्यांनाच द्या ज्यांनी…; भाजप नेत्याचं PM मोदींना पत्र

मुंबई: मिशन ४५ हाती घेऊन लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या सत्ताधारी महायुतीला राज्यात केवळ १७ जागा मिळाल्या. गेल्या निवडणुकीत एकट्या भाजपचे २३ उमेदवार निवडून आले होते. यंदा महायुतीचा एकत्रित आकडा १७ वर आला. महाविकास आघाडीनं मुसंडी मारत ३० जागांवर यश मिळवलं. राज्यात झालेल्या दारुण पराभवाचं विश्लेषण सध्या भाजपकडून सुरु आहे. बैठकांचं सत्र सुरु आहे. या सगळ्या घडामोडी सुरु असताना भाजपच्या पदाधिकाऱ्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे.

राज्यातील उत्तर भारतीय मोर्चाचे उपाध्यक्ष अर्जुन गुप्ता यांनी मोदींना पत्र लिहिलं आहे. ‘तुमच्या नेतृत्त्वात भारत विश्वगुरु होण्याच्या तयारीत आहे. गेल्या ६० वर्षांत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी लोकांना मतांसाठी मूर्ख बनवण्याचं काम केलं. तुम्ही १० वर्षांत भारताचा केलेला विकास संपूर्ण जगानं पाहिला. मात्र तरीही या प्रकारचं मतदान झालं,’ असं गुप्ता यांनी पत्रात लिहिलं आहे.
Ravindra Waikar : वायकरांचा विजय शंकास्पद, खासदारकीची शपथ देऊ नका, थेट लोकसभा सरचिटणीसांकडे मागणी
आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनोबलावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मोफत रेशन बंद करण्यात यावं आणि द्यायचं असेल तर त्यांनाच द्या, ज्यांनी मतदान केलंय. माझ्या पत्रावर तुमची विशेष दयादृष्टी असेल अशी आशाच नव्हे, तर पूर्ण विश्वास वाटतो, असं गुप्ता यांनी पत्राच्या अखेरीस म्हटलं आहे. गुप्ता यांनी १५ जूनला मोदींना पत्र पाठवलं आहे.
Sharad Ponkshe : दहाव्या मिनिटाला चिठ्ठी आली, शरद पोंक्षे नाराज, हे असं होतं.. म्हणून मला इथे बोलायला आवडत नाही
२०१४ आणि २०१९ मध्ये राज्यात प्रत्येकी २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा मात्र फटका बसला आहे. गेल्या निवडणुकीत २५ जागा लढवून २३ जागा खिशात घालणाऱ्या भाजपला यंदा २८ जागा लढवूनही केवळ ९ जागा मिळाल्या. विदर्भात भाजपला फटका बसला. बालेकिल्ल्यात भाजपच्या केवळ २ जागा निवडून आल्या. मराठवाड्यात भाजपला भोपळा मिळाला. चारही जागांवर त्यांचे उमेदवार पराभूत झाले. २०१९ मध्ये भाजपला २७.८४ टक्के मतं मिळाली होती. यंदा हाच आकडा ३ जागा जास्त लढवूनही २६.१८ टक्क्यांवर आला.