शिवतारेंचे अजितदादांना चिमटे, पावसाअभावी मुंबईकरांना घामटे, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. बारामतीत अपक्ष लढायला हवं होतं, १००० टक्के जिंकलो असतो, विजय शिवतारे यांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं, इथे वाचा सविस्तर बातमी

२. मलाही मंत्रिपदातून मोकळं करा, शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचा कित्ता

३. शत्रूच्या गराड्यात वडील एकटे, चक्रव्युहात स्वतःला झोकून दिलं, आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सुषमा अंधारे यांची खास पोस्ट

४. सरींनंतर पुन्हा लाही; आर्द्रता, पावसाच्या अभावामुळे मुंबईकर उकाड्याने त्रस्त, कधी पडणार पाऊस? इथे वाचा सविस्तर वृत्त

५. बहीण व भाचीचा छळ करणाऱ्या जावयाचा मामाने केला खून, सासू, मामे सासऱ्यांसह पाच जणांना अटक, 24 तासात गुन्हा उघड

६. दोन कुटुंबांत ४ संशयास्पद मृत्यू; सासऱ्यांना संपवणाऱ्या नागपुरातील सुनेच्या परिवारात काय घडलं? तपास सुरु

७. नाशिककरांनो सावधान! शहरावर पुन्हा डेंग्यूची छाया; रुग्णसंख्या १२७ वर, गोंविद नगरमधील बाधिताचा मृत्यू

८. रशियन सैन्यातील भारतीय जवानाचा मृत्यू; पंजाबचा तेजपाल युक्रेन युद्धभूमीवर धारातीर्थी

९. भारतीय संघ टी२० विश्वचषकातील सुपर ८ फेरीत; क गटातील अव्वल संघाशी २० जूनला सामना,

१०. माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफची विराट कोहलीवर बोचरी टीका; खराब फॉर्मवरून सुनावले, वाचा नेमकं म्हणाला तरी काय?