शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदास संजय राऊतांचाच विरोध, दादा-तटकरेंवर उगाच खापर, राष्ट्रवादी चिडली

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवावे या प्रस्तावास संजय राऊत यांचाच विरोध होता. मात्र, आता ते अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे-पाटील यांचे नाव पुढे करून धादांत खोटे बोलत आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद दिल्यानंतर उर्वरित अडीच वर्षांसाठी अजित पवार सोडून राष्ट्रवादीतीलच एका नेत्याला मुख्यमंत्री करण्यावरही एकमत झाले होते. राऊत यांनी ते नाव जाहीर करावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.
Narendra Modi : एकनाथ शिंदे कल्याणहून रवाना, नरेंद्र मोदी म्हणाले, तुम्ही निघा, मी इथे सांभाळतो…
महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना तीनही पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपदासाठी नाव हात वर करून जाहीर केले होते. उद्धव यांना मुख्यमंत्री व्हायचे नाही, असेही शरद पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या नावाला अजित पवार, सुनील तटकरे आणि दिलीप वळसे पाटील यांनी विरोध केल्याने नाईलाजाने उद्धव यांना मुख्यमंत्री व्हावे लागले हा संजय राऊत यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे, असेही पाटील म्हणाले.
Uddhav Thackeray : मोदींच्या अडचणीच्या काळात मीही सर्वात आधी धावून जाईन, कारण… उद्धव ठाकरेंचं उत्तरRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

राजकारणात सर्वच गोष्टी जाहीर केल्या जात नाहीत. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, संजय राऊत आणि आमचे तत्कालीन वरिष्ठ नेते यांच्यामध्ये मुख्यमंत्रिपदासाठी सुरुवातीच्या अडीच वर्षांसाठी उद्धव ठाकरे आणि अडीच वर्षांनंतरच्या कालावधीसाठी एक वेगळे नाव ठरले होते आणि त्याविषयी गोपनीयता बाळगण्यात आली होती. याबाबत पक्षातील अजित पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांना माहिती दिली नव्हती, असे पाटील म्हणाले.