शिंदेंकडून ‘चारशे पार’वर पराभवाचं खापर, ‘इंडिगो’ला बॅगांचाच विसर, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. चारशे पारच्या नाऱ्याला संविधान बदलाशी जोडलं गेल्यामुळे गडबड, एनडीएची गाडी ३०० पारही जाऊ शकली नाही, एकनाथ शिंदेंकडून पराभवाचं मंथन, इथे वाचा सविस्तर बातमी

२. तुम्ही केंद्रीय मंत्र्याला पराभूत करुन आलात; उद्धव ठाकरे यांनी थोपटली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांची पाठ

३. लोकसभा अध्यक्षपदी महाराष्ट्रातील नेत्याची वर्णी शक्य, विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपचा विचार

४. तीन-तीन नाही, आंध्र प्रदेशची राजधानी एकमेव अमरावतीच; शपथविधीपूर्वी चंद्राबाबू नायडू यांची मोठी घोषणा

५. अठ्ठावीस केंद्रीय मंत्र्यांविरोधात गुन्हेगारी खटले; एडीआरचा धक्कादायक अहवाल

६. विमान हैदराबादला, तर बॅगा नाशिकच्या ओझर विमानतळावरच, ‘इंडिगो’ एअरलाईन्सच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना फटका, वाचा सविस्तर वृत्त

७. जीर्णोद्धार करताना ढिगारा हटवला, नांदेडमध्ये अतिप्राचीन शिव मंदिराचा पाया सापडला

८. बांगलादेशी घुसखोरांचे लोकसभा निवडणुकांसाठी मतदान, मुंबईत चौघा जणांची धरपकड, सुरतमधील वास्तव्याचे पुरावे समोर

९. युवराज सिंगने केले होते पाकिस्तानचे अभिनंदन; शाहीद आफ्रिदीसोबतच्या व्हिडीओची आता सर्वत्र चर्चा

१०. सिने इंडस्ट्रीला डिप्रेशनची वाळवी, सुशांत सिंहपासून नितीन देसाईंपर्यंत अनेक कलाकारांचा घेतलेला बळी, इथे वाचा सविस्तर