शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना सुनील शेळकेंकडून पूर्णविराम, माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर दिले रोखठोक उत्तर

पुणे: पिंपरी चिंचवडमधील अनेक माजी नगरसेवक शरद पवार गटात जाण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजून पानसरे देखील शरद पवार गटात जाण्यासाठी इच्छुक आहेत. सुनील शेळके हे देखील शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. याबाबत माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता, मग मी कधी जाऊ, न विचारायला पाहिजे मी कधी येऊ, मी अनेकदा सांगितले आहे. गेल्या साडेचार वर्षांमध्ये मावळच्या मायबाप जनतेने मला आमदार केले. या जनतेचे खरे प्रश्न तालुक्याचा विकास जर कोणी केला असेल तर तो अजितदादांनी केला. माझा तर वैयक्तिक स्वार्थ असेल मी त्यांना सोडून इकडे तिकडे उड्या मारेल, असे उत्तर सुनील शेळके यांनी माध्यमांना दिले आहे.
Baramati News: सुनेत्रा पवारांनी आरतीला बोलावलं; सुप्रिया सुळे म्हणाल्या, खूप गर्दी आहे, तुम्हीच करा आरती
कार्ला मंदिर देवस्थान निवडणुकीनंतर आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी हे उत्तर दिले आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक माजी नगरसेवक लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर शरद पवार गटात जाण्यात इच्छुक आहेत. अनेकांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचे चर्चा देखील रंगले आहेत. आझम पानसरे, विलास लांडे, यांसारखे सुरुवातीपासून राष्ट्रवादीत असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात जाण्यात इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे पक्ष बदल होत आहेत.

आज कार्ला येथे सुनील शेळके यांना माध्यमांनी प्रश्न विचारला. पिंपरी चिंचवड मधील अनेक माजी नगरसेवक शरद पवार गटामध्ये दाखल होत आहे, यात तुमच देखील नाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर सुनील शेळके म्हणाले की, मग मी कधी जाऊ, त्यांना विचारला पाहिजे मी कधी येऊ, त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते यांच्यात एकच हशा पिकला. मी बऱ्याचदा सांगितले आहे की, माझ्या मायबाप जनतेने गेल्या साडेचार वर्षांमध्ये माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. जनतेचे प्रश्न खऱ्या अर्थाने जर कोणी सोडले असतील तर ते अजितदादांमुळे सुटले आहेत. माझा तर काही वैयक्तिक स्वार्थ असेल तर मी त्यांना सोडून इकडे तिकडे उड्या मारेल, असे म्हणत सुनील शेळके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.