शप्पथविधी दरम्यान दिल्लीत काय घडले?
रविवारी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात अजित पवार गट नाराज असल्याचे वृत्त समोर आले होते. केंद्रात राज्यमंत्री पद नको अशी मागणी अजित पवार गटाने लावून धरली होती. याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी दिल्लीत नेमके काय घडले यांची माहिती कार्यकर्त्यांना दिली. “केंद्रातून सांगण्यात आले राष्ट्रवादीला लोकसभेची एकच जागा मिळाली त्यामुळे आपल्याला राज्यमंत्री पद देवू पण दिल्लीतील बैठकीत आम्ही तो प्रस्ताव मान्य केला नाही” असे पवार म्हणाले. माध्यमांनी चुकींच्या बातम्या चालवत गैरसमज निर्माण केला आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झाला तुम्हाला आश्वासन देतो की येत्या जुलै अखेरपर्यंत अजित पवार गटाचे ३ खासदार राज्यसभेवर असतील अशी घोषणा अजित पवारांनी केली.
लोकसभेच्या पराभवाची कारणे
नितेश बाबु आणि चंद्राबाबु नायडुंना चांगले यश मिळाले कारण मागासवर्गीय आणि मुस्लिम मते त्यांना मिळाली. लोकसभेत संविधान बदलाच्या चर्चांना उधाण धरले त्यामुळे मागासवर्गीय आणि मुस्लिम मते राष्ट्रवादीपासून दुरावलीत असे मत अजित पवारांनी मांडले. महायुतीबरोबर जरी युतीत असलो तरी आपण शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणार आहोत, मुस्लिम आणि मागासवर्गीय मते दुरावलीत ती पुन्हा मिळवण्यासाठी जोमाने प्रयत्न करा असे सुद्धा पवार म्हणाले. राज्यात काही ठिकाणी कांद्याने आम्हाला रडवले, महत्त्वाच्या जागा पडल्या त्याला कांदा महत्त्वाचे कारण त्यासाठी आगामी राज्याच्या अर्थसंकल्पात कांद्याप्रश्नांवर नीट मार्ग काढणार.