पुणे : शरद पवारांनी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असा सूतोवाच केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट पवारांना एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर दिली. पण पवारांनी ऑफरला न जुगारता ऑफर थेट धुडकावून लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना नांदेड येथे भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी शरद पवार यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. दरम्यान पक्ष विलीनीकरणासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी व्यक्तव्य केलं होतं. प्रसंगी शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीसोबत यावं अशी ऑफर दिली होती. मात्र ही ऑफर पवार यांनी थेट धुडकावून लावली. शरद पवार म्हणाले, व्यक्तिगत संबंध वेगळे आणि धोरणात्मक संबंध वेगळे. मोदींमुळे संसदीय लोकशाही संकटात आली, असं माझं स्पष्ट मत आहे. दिल्ली आणि झारखंडचे मुख्यमंत्री यांना तुरुंगात टाकण्याची भूमिका घेतली. याच्यामागे केंद्र सरकार आणि केंद्रीय नेतृत्वाचा सहभाग असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे, की लोकशाही पद्धतीवर कोणाचा कितपत विश्वास आहे. व्यक्तिगत सोडा राजकीय दृष्टीने देखील माझ्याकडून कधीच होणार नाही. असं म्हणत पवारांनी मोदींची ती ऑफर धुडकावली.
पुढे पवार असं म्हणाले, ‘गांधी, नेहरूंची विचारधारा आमच्यात आहे. त्यांचं एक विधान मी वाचलं. मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला. हा देश एक संघ ठेवायचा असेल, तर सर्व धर्म घटकांना एकत्र ठेवून देश पुढे न्यावा लागेल. एखाद्या समाजाविषयी वेगळी भूमिका मांडायला लागलो, तर समाजात गैर विश्वास निर्माण होईल. मोदींची अलीकडची सगळी भाषणं समाजा – समाजामध्ये गैरविश्वास निर्माण करणासाठी पोषक आहेत. देशाच्या दृष्टीने, समाजासाठी ते घातक आहे. जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी, आमचे सहकारी असणार नाहीत.’