मुंबई: लोकसभा निवडणुकीआधी १० जागा लढवून ८ जागांवर यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिला आहे. लोकसभेला तुतारी चिन्हावरुन झालेला गोंधळ पुढील निवडणुकांमध्ये टाळण्यासाठी शरद पवार गटानं केलेली विनंती निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला दिलासा मिळाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यात आल्यानंतर शरद पवार गटाला नवं नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यात आलं. त्यांना तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह दिलं गेलं. पण लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट लढवत असलेल्या अनेक जागांवर अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट चिन्ह देण्यात आलं. त्याचा उल्लेख तुतारी असा करण्यात आला. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याचा फटका शरद पवार गटाच्या उमेदवारांना बसला.
एखाद्या उमेदवाराला ट्रम्पेट चिन्ह देण्यात आल्यास त्याचा उल्लेख ट्रम्पेट असाच करण्यात यावा. त्याचा उल्लेख तुतारी असा होऊ नये, अशी मागणी शरद पवार गटानं निवडणूक आयोगानं केली होती. ही मागणी निवडणूक आयोगानं मान्य केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला बूस्टर मिळाला आहे.
लोकसभेला चिन्हावरुन घोळ होऊनही शरद पवार गटानं १० पैकी ८ जागा खिशात घेतल्या. त्यांचा स्ट्राईक रेट ८० टक्के होता. अन्य कोणत्याही पक्षाला अशी कामगिरी जमलेली नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी एकसंध असताना पवारांच्या पक्षाची लोकसभेतील सर्वोच्च कामगिरी ९ जागा होती. पक्षात प्रचंड मोठी फूट पडून आणि चिन्ह, पक्ष गमावूनही शरद पवारांनी ८ जागा खेचून आणत जोरदार कमबॅक केलं.
लोकसभा निवडणुकीत काय घडलं?
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार लढत असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट चिन्ह देण्यात आलं. त्याचा उल्लेख तुतारी असा करण्यात आला. तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस अशा दोन चिन्हांमुळे मतदारांचा गोंधळ झाला. त्याचा फटका शरद पवार गटाला दिंडोरी, बीड, साताऱ्यात बसला. दिंडोरीत तुतारीवर लढणाऱ्या अपक्ष उमेदवारानं तब्बल लाखभर मतं घेतली. साताऱ्यात शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा ३७ हजार ६२ मतांनी पराभव झाला. साताऱ्यात अपक्ष लढणाऱ्या संजय गडेंनी ३७ हजार मतं घेतली. त्यांना तुतारी चिन्ह देण्यात आलं होतं.