१२ संभाव्य उमेदवारांच्या नावांबाबत
दिल्लीतील पक्षनेतृत्वाशी राज्याच्या भाजप नेतृत्वाने नुकतीच चर्चा केली. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी असलेले केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव मुंबईच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. विधान परिषदेचे ११ सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होणार आहेत.
या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, विधान परिषदेवर कोणाला संधी मिळते, याची उत्सुकता भाजपमध्ये आहे. विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी, २५ जूनपासून २ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. ५ जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असेल. १२ जुलै रोजी रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहेत.
कोणाकोणाची नावं चर्चेत?
विधानसभा निवडणुकांपूर्वी विधान परिषदेत संधी देऊन जातीय समीकरणे जुळवण्याची भाजपची धडपड आहे. त्या आधारे जी अन्य नावे विधान परिषदेसाठी चर्चेत आहेत त्यात हर्षवर्धन पाटील, अमित गोरखे, परिणय फुके, योगेश टिळे, निलय नाईक, चित्रा वाघ व माधवी नाईक आदींचा समावेश आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
महाविकास आघाडीकडून धक्क्याचे संकेत
दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून तिसरा उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याची रणनीती मविआतील नेत्यांनी आखल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे. रिक्त जागांपैकी महायुतीकडे नऊ, तर महाविकास आघाडी दोन जागा निवडून आणण्याचे संख्याबळ आहे. परंतु त्यांच्याकडून तिसरा उमेदवार उतरवून गुप्त मतदानाचा फायदा उचलला जाण्याचा प्रयत्न होऊ शकतो.