विधानपरिषदेसाठी अजितदादांनी दंड थोपटले, पत्नीच्या राज्यसभेनंतर ‘समतोल’ राखण्याचा प्रयत्न

मुंबई : विधानपरिषद निवडणुकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयारी सुरु केली आहे. विधानपरिषदेवरील ११ रिक्त जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. यावेळी विधानपरिषदेवर राष्ट्रवादी एक अल्पसंख्याक, तर एक दलित समाजातील चेहरा पाठवणार असल्याची माहिती आहे.

सर्व जातींचा समावेश

राज्यसभेवर सुनेत्रा पवार यांच्या रुपाने अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा चेहरा दिला. त्यानंतर आता होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी एक अल्पसंख्याक, तर एक दलित चेहरा पाठवणार असल्याचं बोललं जात आहे.

कोणाकोणाला संधी?

बाबाजानी दुर्रानी आणि सिद्धार्थ कांबळे यांची नावं विधानपरिषदेसाठी चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षापासून दुरावलेली अल्पसंख्याक आणि दलित मतं पुन्हा मिळवण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरु केल्याचे चित्र आहे.
Ravindra Waikar : वायकरांचा विजय शंकास्पद, खासदारकीची शपथ देऊ नका, थेट लोकसभा सरचिटणीसांकडे मागणी
विधानसभेच्या आधी विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेचे ११ सदस्य २७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर १२ जुलै रोजी ११ जागांसाठी निवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
Sujay Vikhe : भाजप उमेदवाराचाही EVM वर संशय, सुजय विखेंची पडताळणीची मागणी, १८ लाखांचं शुल्कही जमा

कोणाकोणाचा कार्यकाळ संपणार?

२७ जुलै २०२४ रोजी डॉ. मनिषा कायंदे, विजय गिरकर, बाबाजानी दुर्राणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, डॉ. वजाहत मिर्जा, डॉ. प्रज्ञा राजीव सातव, रासप नेते महादेव जानकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

निवडणूक प्रक्रिया कशी?

२५ जून रोजी विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रकिया सुरू होईल. २ जुलै उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असेल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३ जुलै रोजी अर्जांची छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ५ जुलै आहे. तर मतदान १२ जुलै (शुक्रवार) रोजी होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ दरम्यान मतदान झाल्यानंतर मतमोजणीही त्याच दिवशी म्हणजेच १२ जुलै रोजीच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.