सहनशीलतेलाही मर्यादा असते, ‘करारा जवाब’ मिलेगा
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बारामती येथे आयोजित महिला मेळाव्याला उपस्थित महिलांशी संवाद साधताना आयुष्यात पैसा नाही तर नाती महत्वाची असतात, त्यातही नाते तोडण्यापेक्षा ते नाते जपणे जास्त अवघड असते, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सुनंदा वहिनींमध्ये मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व असे तिन्ही गुण आहेत, पण काहीजण याचे भान न ठेवता टीका करतात, हे दुर्देवी असल्याचे सांगितले. माझ्या कुटुंबांवर आज टीका केली जात आहे. त्या टीकेची उत्तरे माझ्याकडे आहेत, पण मी ते देणार नाही, कारण माझ्यावर नाती जपण्याचे संस्कार झाले आहेत. पण मी उत्तर देत नाही म्हणून त्याचा अतिरेक करु नका, नाही तर सहनशीलतेलाही मर्यादा असते, त्यामुळे परत टीका कराल तर ‘करारा जवाब’ मिळेल असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही
पुढे सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काश्मीर ते कन्याकुमारी पक्ष आहे त्यांना एक उमेदवार मिळत नाही. आमच्या घरात उमेदवारी दिली. आमचं घर फोडत निर्णय घेतला. बदल तिकडे हाजी करून होणार नाही. मी तुमच्यासाठी लढणार असल्याचे त्या म्हणाल्या. आमच्या खानदानाचे वाभाडे निघतील ते मी होऊ देणार नाही. बारामती म्हणजे शरद पवार असून दुसऱ्यांनी गैरसमज करू नये हे सगळं आमच्यामुळे आहे. विकास सगळ्यांच्या मदतीने होत असतो, कामे फक्त सत्तेतून होतात असे सांगितले जाते, १० वर्ष विरोधात खासदार आहे अनेक प्रकल्पात देशात बारामतीचा पहिला नंबर लागतो. वाराणसीपेक्षा बारामती सगळ्यात पुढे आहे असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.