हवेली तालुक्यात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. त्यावेळी अजित पवार यांनी ही तोफ डागली.
यावेळी अजित पवार म्हणाले की, आम्ही ज्यावेळी राजकीय भूमिका घेतली त्यावेळी आमच्या घरी मी बसलो होतो. डॉ. कोल्हे होते, अशोक पवार होते. सगळ्यांनी आपण हा चांगला निर्णय घेतला पाहिजे म्हटलं. सगळेजण माझ्या सोबत शपथविधीसाठी आले, कोल्हे साहेबांनी प्रतिक्रिया दिली. अशोक पवार मला म्हणत होते, दादा सत्ता असल्याशिवाय काय खरं नाही, असं सतत मला सांगणाऱ्यांपैकी तो एक होता. पण ज्या वेळेत शपथविधी पहिली मी घेतली, दुसरी भुजबळ साहेबांनी घेतली, तिसरी किंवा चौथी शपथ दिलीप वळसे पाटील यांचे नाव आले, तिथं गडी बिथरला. तो म्हणाला ही शपथ घ्यायला दादांनी परवानगी द्यायला नको होती. मला यांना घेतलेलं अजिबात आवडलेलं नाही. हा काय एवढा मोठा नेता आहे का ओ? अरे काय तू… तुला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं. आणि तू अशा पद्धतीच्या गप्पा मारतो? असा सवाल अजित पवारांनी विचारला.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
इथे येऊन अशोक पवारांनी सांगितले, मी पवार साहेबांचा निष्ठावंत आहे. ते म्हणाले तर मी राजीनामा देखील देईन. अरे सगळी तुझी अंडी पिल्ली मला माहिती आहेत. या तू गप्पा मारतो. उगीच मी आपलं कुणाची भावकी आहे म्हणून आपलं काही निंदानालस्ती करत नाही. भावकी कुणाची वाटेकरी आहे हे माहीत आहे. असे म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांच्यावर चांगलीच आगपाखड केली आहे.