महामुंबई परिसरातील सुमारे दोन हजार पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना आवडलेल्या पुस्तकावरील लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’कडे पाठवले. प्राथमिक फेरीत त्या दोन हजार लेखांमधून २०० लेख निवडण्यात आले व दुसऱ्या फेरीत त्या २०० लेखांमधील २० लेखांची निवड करण्यात आली. अंतिम फेरीत या २० लेखांमधून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे लेख निवडण्यात येणार असून, दोन लेखांना उत्तेजनार्थ म्हणून गौरविण्यात येणार आहे. हा अंतिम निकाल लवकरच ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये जाहीर करण्यात येईल.
१२ जून रोजी पुरस्कार सोहळा
‘वाचाल तरच वाचाल’ या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा येत्या १२ जून रोजी ‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर हे या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने त्यांच्या खास शैलीतील मार्गदर्शन, संवाद उपस्थितांना अनुभवता येईल. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सध्या विविध कार्यक्रम, उपक्रम ‘महाराष्ट्र टाइम्स कॅलिडोस्कोप’ अंतर्गत साजरे होत आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा त्याचाच एक भाग असेल. या बाबतचा आणखी तपशील लवकरच जाहीर केला जाईल.
अंतिम फेरीत दाखल झालेले २० स्पर्धक (त्यांचे आवडते पुस्तक व पुस्तकाचे लेखक/लेखिका)
१) खुशाल वसंत सूर्यवंशी, सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाणे (फिन्द्री – सुनीता बोर्डे)
२) आश्लेषा शां. फाकटकर, राज्य गुप्तवार्ता विभाग (माझा साक्षात्कारी हृदयरोग – अभय बंग)
३) वरुण मोहन पाटील, पोलिस मुख्यालय, ठाणे शहर (आठवणींचे पक्षी – प्र. ई. सोनकांबळे)
४) ए. एम. वाघमोडे, वांद्रे रेल्वे पोलिस ठाणे (सुखन – तन्वी अमित)
५) अमरजित राजाराम यादव, पोलिस आयुक्त, लोहमार्ग मुंबई (आपण सारे अर्जुन – व. पु. काळे)
६) प्रदीप रविंद्र पवार, वांद्रे लोहमार्ग पोलिस ठाणे (द अल्केमिस्ट – पाऊलो कोएलो)
७) विजय आवकीरकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक (आमचा बाप अन् आम्ही – नरेंद्र जाधव)
८) प्राजक्ता मनोज गोराणे, पालघर रेल्वे पोलिस ठाणे (स्वतःवर विश्वास ठेवा – डॉ. जोसेफ मर्फी)
९) निखील प्रताप निंबाळकर, पालघर रेल्वे पोलिस ठाणे (शेतकऱ्याचा असूड – महात्मा जोतिबा फुले)
१०) मोनिका प्रकाश भोईर, पालघर रेल्वे पोलिस ठाणे (द अल्केमिस्ट – पाऊलो कोएलो)
११) बी. एन. नवघरे, वसई रोड पोलिस ठाणे (फकिरा – अण्णा भाऊ साठे)
१२) जी. के. तेली, सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाणे (वनवास – प्रकाश नारायण संत)
१३) वैशाली गुरव, सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाणे (माझे सत्याचे प्रयोग – महात्मा गांधी)
१४) के. पी. झिमण, वांद्रे रेल्वे पोलिस ठाणे (कळ्यांचे निश्वास – विभावरी शिरूरकर)
१५) आर. डी. तांबोळी, वांद्रे रेल्वे पोलिस ठाणे (ए मॅन कॉल्ड ओव्ह – फ्रेडरिक बॅकमॅन)
१६) जयराम वाघमारे, कुर्ला रेल्वे पोलिस ठाणे (जग बदलणारा बापमाणूस – जगदीश ओहोळ)
१७) मृदुला दिघे, पोलिस उपअधीक्षक, नवी मुंबई (कैदी नंबर सी १४८६१ – सुहास गोखले)
१८) हेमंत भास्कर पवार, पोलिस हवालदार, वरळी (बाजिंद – पै. गणेश मानगुडे)
१९) जालिंदर प्रल्हाद मोरे, मुलुंड पोलिस ठाणे (अंधाराचे बुरूज ढासळतील – डॉ. आ. ह. साळुंखे)
२०) राहुल श्रीजय काळे, नायगाव (उचल्या – लक्ष्मण गायकवाड)