लोकसभेला आपटले, विधान परिषदेला गाडी रुळावर, शिंदे-फडणवीस सातव्या आस्मानावर, विजयानंतर म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्रातील एमएलसी निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने राज्यातील विधान परिषद निवडणुकीत मोठा विजय नोंदवला आहे. यामुळे आता महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात विधान परिषदेच्या सदस्यांसाठी ११ जागांसाठी मतदान झाले. याचा निकाल लागला आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना प्रतिक्रिया दिली आहे.विधान परिषद निवडणुकीत महायुतीने ९ जागा जिंकल्या आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे तसेच एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे कृपाल तुमाने, भावना गवळी हे विजयी झाले आहेत. महायुती आघाडीसाठी ही निवडणूक यशस्वी ठरली आहे. यावर आता महायुतीच्या नेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ते विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत आहेत. तसेच विरोधकांवर टीकाही करत आहे.
MLC Election Results : आता कमिटी वगैरे काही नाही, गद्दारांना थेट बाहेरचा रस्ता, मते फुटल्यावर नाना पटोले प्रचंड संतापले!

निकालानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महायुतीला मोठा विजय मिळाला आहे. हा फक्त ट्रेलर आहे. आता विधानसभेत जनता आम्हाला मतदान करेल. हा विजय फक्त ट्रेलर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

निकालानंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आज आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या महायुतीने ९ जागा निवडून आणल्या आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत आमचे महायुती सरकार स्थापन होईल. या निवडणुकीत मविआची काही मते आम्हाला मिळाली. त्यामुळे आमचा विजय झाला असल्याचे ते म्हणाले.

फडणवीस पुढे म्हणाले की, सामान्यांमध्ये राहून काम करणारे आमचेच उमेदवार आहेत. सदाभाऊ खोत शेतकऱ्यांचे आणि जनतेचे नेते आहेत. त्यामुळे ते निवडून आले. तसेच यापुढेही मोदींच्या मार्गदर्शनाखाली महायुती निवडून येणार आहे. याच निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. दोन वर्षात राज्यात अनेक कामं झाली असल्याने त्याचा निकाल या निवडणुकीत पहायला मिळाला. मी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.