मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपनं सपाटून मार खाल्ला. गेल्या निवडणुकीत २५ जागा लढवून २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा २८ जागा लढवून केवळ ९ जागा मिळाल्या. राज्यात भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. पक्षाचे दिग्गज नेते, केंद्रीय मंत्री या निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर आता भाजपनं लोकसभेसाठी रणनीती बदलली आहे. त्याची सुरुवात विधान परिषदेपासून करण्यात आली आहे. भाजपनं परिषदेसाठी ५ नावांची घोषणा केली आहे. त्यातील ३ जण ओबीसी समाजातून येतात. पंकजा मुंडेंना उमेदवारीनं भाजपनं संघटना आणि मतदारांमध्ये सूचक मेसेज दिला आहे.
जातीय समीकरण अन् माधव पॅटर्न
गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांनी राज्यात भाजप रुजवण्यासाठी माधव पॅटर्न राबवला. त्याचा फायदा पक्षाला झाला. पण गेल्या काही वर्षांमध्ये भाजपनं नरेंद्र मोदींच्या नावावर फोकस केला. त्याचा फायदा २०१४, २०१९ च्या निवडणुकीत झाला. पण २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला. मोदींनी सभा घेतलेल्या १७ पैकी १४ ठिकाणी महायुतीला पराभव पाहावा लागला. पंकजा मुंडेंचा बीडमध्ये निसटता पराभव झाला. त्यानंतर आता भाजपनं त्यांना विधान परिषदेवर संधी दिली आहे.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरु केलेल्या आंदोलनाचा फटका भाजपला मराठवाड्यात बसला. मराठा मतदार दुरावले. पक्षाचा पारंपारिक मतदार असलेल्या ओबीसी समाजनंही पाठ फिरवली. परिणामी राज्यभर फटका बसला. मराठवाड्यात चारही जागांवर भाजपचा पराभव झाला. त्यामुळे आता मुंडेंना आमदारकी देत भाजपनं ओबीसी समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंडेंना संधी देण्याचा फायदा पक्षाला १० ते २५ जागांवर होऊ शकतो.
एक अकेला देवेंद्र नव्हे, आता सामूहिक नेतृत्त्व
देवेंद्र फडणवीस २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे साईड लाईन झाले. जनाधार असलेल्या नेत्यांना बाजूला करण्याचा फटका भाजपला निवडणुकीत बसला. त्यानंतर आता पक्षानं सामूहिक नेतृत्त्वाच्या दृष्टीनं वाटचाल सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून पंकजा मुंडेंना ताकद दिली जात आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या बैठकांमध्ये सामूहिक नेतृत्त्वाचा विषय उपस्थित झाला होता.

महिला मतदार
लोकसभा निवडणुकीत महिला मतदार भाजपपासून दुरावला. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये महिला मतदारांनी भाजपला भरभरुन मतदान केलं होतं. पण यंदा महिलांनी भाजपकडे पाठ फिरवली. भाजपकडे पंकजा मुंडेंच्या रुपात महिला चेहरा आहे. पण गेल्या काही वर्षांपासून त्याच साईड लाईन झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे विधानसभेआधी भाजपनं महिला चेहऱ्याला संधी दिली आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार अपेक्षित आहे. त्यातही मुंडेंना स्थान मिळू शकतं.