लोकसभा निवडणुकीचे Exit Polls जाहीर, राज्यातील नेतेमंडळींनी दिली प्रतिक्रिया, वाचा नेमकं काय म्हणाले?

मुंबई: सातव्या टप्प्यातील मतदानासह लोकसभा निवडणूक २०२४ ची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून एक्झिट पोल जाहीर होऊ लागले. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे. निकालापूर्वी विविध माध्यम वाहिन्या आणि सर्वेक्षण संस्थांनी आज संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर केले. यात एनडीएला यश मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे. यानंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी एक्झिट पोलच्या डेटावर पहिली आणि सर्वात मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारत आघाडीला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा नाना पटोले यांनी केला.

संदिपान भुमरे

एक्झिट पोल मी बघितलेला नाही. तुम्ही सांगितल्यानंतर मला एक्झिट पोलमध्ये काय आहे ते कळालं आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी मी एक ते दीड लाख मतांनी निवडून येणार आहे. या ठिकाणी दोन नंबरसाठी रस्सीखेच सुरू असून मी मात्र यामध्ये निवडून येणार, असल्याचं पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितलं.
Loksabha Election Exit Polls 2024 Live Updates : सांगलीचा धक्कादायक अंदाज, भाजप पराभवाच्या छायेत, विशाल पाटलांना सरशी

शिवसेना नेते संजय निरुपम

शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले, “४ जूनला काय होईल हे एक्झिट पोलमधून कळू शकत नाही. मला विश्वास आहे की महाराष्ट्रात एनडीएने गेल्या वेळी जितकी मते मिळवली होती तितकीच मतेही एनडीए जिंकेल आणि निश्चितपणे कोणतेही नुकसान होणार नाही. “करणार नाही.”

महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे

लोकसभा निवडणुकीमध्ये ही कुण्या एकट्याची निवडणूक नव्हती, तर मोदी विरुद्ध जनता अशी निवडणूक झाली आहे. यामध्ये इंडिया आघाडीला जनतेने कौल दिला आहे. जालन्यामध्ये एक्झिट पोल माझ्या विरोधात दाखवतला जात असला तरी हे दाखवणारे कोण आहेत? कोणाच्या मालकीचे आहेत, हे मी वेगळे सांगायचे काही गरज नाही. मात्र देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल आणि जालन्यामध्ये मी निवडून येईल, असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. शिवाजी काळगे

देशातील सातव्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं यामध्ये आहे. यानंतर अनेक वृत्तसंस्थेने आपले एक्झिट पोल देण्यास सुरुवात केली आहे यामध्ये स्पष्ट बहुमत कोणाला मिळेल याबाबत अनेकांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. याच अनुषंगाने लातूर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे. याच सोबत २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसला मात्र एका जागेवर समाधान मानावे लागले होते याच्या उलट यावेळी काँग्रेसला दहा जागा मिळतील असा विश्वास डॉक्टर शिवाजी काळगे यांनी व्यक्त केला आहे..

मनोज जरांगे पाटील

लोकसभा निवडणूक असली तरी आम्ही राजकारणामध्ये सहभागी नव्हतो. आम्ही कुणाला निवडून आणा किंवा कोणाला पाडा असं म्हटलं नव्हतं. मात्र मी समाजाला आव्हान केलं होतं. मी ४ जून रोजी उपोषणाला बसण्यावर ठाम आहे. मात्र सरकारकडून काही माझ्या जवळच्या लोकांना जवळ करून पैसे वाटप केले जात आहे. मात्र मी उपोषणाच्या निर्णयावर ठाम असून काहीही केलं तरी मी उपोषण करणार, असल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

संजय जाधव

एक्झिट पोल आपले आकडे सांगत असले तरी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 35 च्या वर जागा मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिवसेना संपविण्याचा जो भाजपने घाट घातला होता. यामुळे सर्वसामान्यांमध्ये त्यांच्या विषयीची होती. शिवसेना पक्ष फोडला पक्ष शिंदेंना दिला हे सर्वसामान्यांना पडलं नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या जागा या जास्त येताना दिसत असल्याचे जाधव म्हणाले.