लेकीच्या वाढदिवसाहून परतताना कुटुंबावर काळाचा घाला, कार कालव्यात कोसळून सहा जणांचा मृत्यू

सांगली : अल्टो अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. गाडी ताकारी कॅनलमध्ये कोसळल्यामुळे सहा जणांना प्राण गमवावे लागले. मुलीच्या वाढदिवसाहून परत येताना कुटुंबावर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात एकच महिला बचावली असून तिची प्रकृतीही गंभीर आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अल्टो अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काल मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा भयंकर अपघात झाला. तासगाव मणेराजुरी मार्गावरील ताकारी कॅनलमध्ये अल्टो कार कोसळली. अपघाताच्या वेळी या गाडीतून एकाच कुटुंबातील सात जण प्रवास करत होते. या घटनेमुळे परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Eknath Shinde : एकनाथ शिंदे पायउतार होणार? महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळण्याच्या चर्चा, शिवसेना म्हणते…
हे सर्व नातेवाईक मुलीच्या वाढदिवसासाठी सांगली जिल्ह्यातील कवठेमहंकाळ तालुक्यातील एका गावात गेले होते. सोहळा आटपल्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांनी परतीचा प्रवास सुरु केला. तासगावच्या दिशेने येत असताना चिंचणी हाती येथे ताकारी कॅनलमध्ये अल्टो कार अचानक कोसळली.

अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास प्रवास करत असल्यामुळे चालकाला थकवा येऊन झोप अनावर झाली असावी. आणि नेमकी गाडी चालवत असतानाच डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या वृत्तामुळे ज्या मुलीच्या घरुन कुटुंब वाढदिवसाचा सोहळा साजरा करुन परत येत होतं, ते शोकसागरात बुडाले आहेत.
Manoj Jarange : मनोज जरांगेंविषयी आक्षेपार्ह पोस्टमुळे संताप, समर्थकांनी घरात घुसून धुतलं, तरुणावर गुन्हाRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे कुटुंब नेमकं कुठलं होतं, त्यांची नावं अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या विविध भागात अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यात अनेकांना प्राणही गमवावे लागले आहेत. सांगलीतील दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.