प्रतिनिधी, पुणे : पुणे ते राजस्थान मार्गावर गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यामार्गे दौंड ते अजमेर साप्ताहिक उन्हाळी विशेष एकूण २० गाड्या सोडण्यात येणार आहेत.दौंड-अजमेर (क्रमांक ०९६५८) ही सुपरफास्ट साप्ताहिक विशेष एक जुलैपर्यंत सोडण्यात येणार आहे. दर सोमवारी दौंड येथून रात्री १० वाजून १० मिनिटांनी ही गाडी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजून ३५ मिनिटांनी अजमेरला पोहोचेल. अजमेर-दौंड (क्रमांक ०९६५७) ही सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी ३० जूनपर्यंत सोडण्यात येणार आहेत. दर रविवारी अजमेरहून सायंकाळी सात वाजून ५५ मिनिटांनी ही गाडी सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी सहा वाजून २० मिनिटांनी दौंडला पोहोचेल.
या गाडीला पुणे, लोणावळा, पनवेल, वसई रोड, भोईसर, वापी, वलसाड, सुरत, भरूच, बडोदा, गोध्रा, दाहोद, रतलाम, मंदसौर, निमच, चित्तोडगड, चंदेरिया, भिलवाडा, विजयनगर आणि नसिराबाद या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.