पुणे : पुण्यात पोर्शे अपघातनंतर आंबेगाव तालुक्यातून पुन्हा एका कारने दुचाकीला उडवल्याची घटना समोर आली आहे. एका कारचालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कार चालक हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे.ओम सुनिल भालेराव असे अपघातात मृत्यू झालेल्याचं नाव आहे. याबाबत मंचर पोलीस स्टेशनमध्ये नितीन रामचंद्र भालेराव यांनी फिर्याद दिली आहे. आंबेगाव तालुक्यातील एकालहरे गावाजवळ ही घटना रात्री उशिरा घडली आहे. मयूर साहेबराव मोहिते असं चारचाकी चालकाचं नाव आहे. तो खेड तालुक्यातील मोहितेवाडी, शेल पिंपळगाव येथे राहणारा आहे. याच्या विरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – नाशिक महामार्गावर असणाऱ्या एकालहरे गावाजवळ ओम भालेराव हा मंचरहून कळंबच्या दिशेने क्रमांक एम.एच. ०४ ४४२९ गाडीने येत होता. त्यावेळी कळंब बाजूकडून मंचरकडे येणारी फॉरच्यूनर गाडी क्रमांक एम.एच.१४ के.जे. ७५५७ वरील चालकाने भरधाव वेगाने रोडच्या विरूद्ध बाजूने चालवून मोटार सायकलला जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ओम भालेराव याच्या डोक्याला मार लागला. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ओमला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालय मंचर येथे पाठवण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून संगण्यात आले. अपघातनंतर मयूर हा घटनास्थळी न थांबता निघून गेला. त्यामुळे नितीन भालेराव यांनी मंचर पोलीस स्टेशनमध्ये मयूर मोहिते विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अधिक तपास मंचर पोलीस करत आहेत.