रस्त्याअभावी शेतकऱ्याच्या मृतदेहाच्या यातना, कामगार मंत्र्यांच्या मतदारसंघात धक्कादायक प्रकार

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीच्या मिरज मतदारसंघात रस्त्याअभावी एका शेतकऱ्याला मृत्यूनंतरही मरण यातना भोगाव्या लागल्या आहेत. विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यानंतर मृतदेह तब्बल दीड किलोमीटर रस्त्याअभावी झोळीतून घेऊन जाण्याची वेळ शेतकऱ्याच्या नातेवाईकांवर आली. तर काही अंतर ट्रॅक्टरमधून देखील पार करावे लागले. मग एका रुग्णवाहिकेने नंतर त्यांचा मृतदेह घेऊन जाण्यात आला.मिरज तालुक्यातल्या वड्डी येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील येसूमळा येथे संतोष येसूमाळी या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे.मृत येसूमाळी. हे रात्रीच्या वेळी शेतात गुरांना पाणी पाजण्यासाठी गेले असता विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सदरचा रस्ता करण्याबरोबर दिवसा वीज मिळावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.
Sanjay Raut: आम्ही सिनियर; शिंदे मुख्यमंत्री नको म्हणणारे पहिले दादा अन् तटकरे, राऊतांचा मोठा दावा

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सांगलीमध्ये अवकाळी पावसाने झोडपले आहे. त्यामुळे वड्डी या गावांमध्ये असणाऱ्या पाणंद रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पाणंद रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळेच शेतकऱ्याच्या मृतदेहाची हेळसांड करत त्याला सुरुवातीला झोळीमधून त्यानंतर ट्रॅक्टरमधून नेण्याची वेळ आली. त्यामुळे मृताच्या नातेवाईकातून संताप व्यक्त केला जातोय.