बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदावरून तुम्हाला हटवले आहे का? यावर उत्तर देताना ते म्हणाले, अशा स्वरूपाची चर्चा माझ्या कानावर यापूर्वी देखील आली आहे, परंतु माझ्यापर्यंत कोणतेही पत्र आलेले नाही. अर्थात आता आयोजित होणाऱ्या मैदानाबाबत आपल्याला विचारणा झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुस्तीची अनेक मैदानं व्हावीत व त्याद्वारे आपल्या परिसरातील कुस्तीगिरांना संधी मिळावी हे काय वाईट नाही. त्यामुळे एकापेक्षा अधिक कुस्तीची मैदाने आयोजित झाली पाहिजेत. आपण देखील पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीप्रमाणे कुस्तीचे मैदान आयोजित करणारच आहोत, असेही ते म्हणाले.
गेली अनेक वर्षांपासून म्हणजे मी सात, आठ वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुस्तीचे मैदान सुरू केले. त्यानंतर गेल्या काही वर्षात मी देखील त्यात सहभागी झालो. मैदान तर जुनेच आहे, ते कोण भरवत होते ते सर्वांना माहित आहे. आता जे मैदान भरवले जाणार आहे, ते मात्र नवीन आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आपले मैदान पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण आयोजित करणारच आहोत असे युगेंद्र पवारांनी स्पष्ट केले.
शरद पवारांच्या उपस्थितीत अहिल्यादेवी होळकरांची जयंती
गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील अहिल्यादेवी होळकर यांची जयंती बारामतीत आयोजित होणार आहे. या जयंतीला राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, आमदार संग्राम संजय जगताप, उत्तम जानकर यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती युवा नेते युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. १८ जुलै रोजी हा जयंती उत्सव बारामतीत होणार असून सर्व समाजातील घटकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान युगेंद्र पवार यांना भाजप व राष्ट्रवादीचे आतापर्यंत कार्यकर्ते हे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करत होते व दोन स्वतंत्र कार्यक्रम होत होते. अशा स्वरूपाची माहिती दिल्यानंतर त्यांनी सांगितले की, आतापर्यंत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते ही जयंती उत्सव साजरी करत होते. मात्र ज्यावेळी नेतेमंडळी आणायचा विषय होता तेव्हा शरद पवार हेच नेते आणायचे. भाजप व राष्ट्रवादीचे नेते जयंती उत्सव साजरे करायचे परंतु यावेळी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करावा. या दृष्टीने अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांच्या माध्यमातून येत्या 18 जुलै रोजी हा जयंती उत्सव होणार आहे. असे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.