मोदींनी PM पदाची प्रतिष्ठा घालवली; कोणे काळी आरोप करणारे हजारे-खैरनार आता कुठेत? पवारांचा सवाल

मुंबई : महाविकास आघाडीची कामगिरी प्रभावी असेल, ते किमान ५० टक्के जागा जिंकतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी वापरलेल्या भाषेमुळे पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा कमी झाली आहे, मात्र अण्णा हजारे किंवा जी आर खैरनार यासारख्या व्यक्तींनीही माझ्यावर गंभीर आरोप केले होते, मात्र आता त्यांचं अस्तित्वच राहिलं नाही, असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवार यांनी भाष्य केलं.

शरद पवार काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची कामगिरी प्रभावी असेल, ते किमान ५० टक्के जागा जिंकतील. महाराष्ट्रातील प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी जी भाषा वापरली होती, त्यामुळे मी थक्क आणि आश्चर्यचकित झालो. धक्कादायक म्हणजे, त्यांनी माझा उल्लेख ‘भटकती आत्मा’ असा केला आणि शिवसेना (ठाकरे गट) नकली असल्याची टीका केली. पंतप्रधानांकडून अशा प्रकारची भाषा अपेक्षित नाही; त्यांनी पदाची प्रतिष्ठा कमी केली आहे. पण पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे मी विचलित झालो नाही. यापूर्वीही समाजसेवक अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी आर खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते, मात्र आता या दोघांचा कुठे थांगपत्ता नाही, अशी टीकाही शरद पवार यांनी केली.

माझ्या मते मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी आत्मविश्वास गमावल्याचे दिसून येते, त्यामुळे त्यांनी व्यापक प्रचारासाठी महाराष्ट्राची निवड केली आहे. पूर्वी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधींसारखे पंतप्रधान फक्त एक किंवा दोन निवडणूक रॅलींना संबोधित करायचे, असेही पवार म्हणाले.
Lok Sabha Elections 2024 : स्मृती इराणी, राजनाथ ते राहुल गांधी, वर्षा गायकवाड, अनिल देसाई; लक्षवेधी लढतींची संपूर्ण यादी
नरेंद्र मोदींचे मत अवास्तव असल्याचे दिसून येते. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी ‘अबकी बार, ४०० पार’ असा नारा दिला आहे. मला माहित नाही की ते कोणत्या आधारावर ४०० च्या आकड्यावर पोहोचले आहेत, तो गाठणे फार कठीण आहे. देशभरात एनडीएविरोधात तीव्र असंतोष पाहता भाजप बहुमताचा आकडा गाठेल की नाही, याबद्दल मला शंका आहे. दक्षिणेकडील सर्व राज्यांमध्ये एनडीएची कामगिरी निराशाजनक असेल. याशिवाय, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह इतर अनेक राज्यांमध्ये भाजपसाठी ही निराशाजनक स्थिती असेल, असं शरद पवार म्हणाले.
Sanjay Raut : शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदास संजय राऊतांचाच विरोध, दादा-तटकरेंवर उगाच खापर, राष्ट्रवादी चिडलीRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण?

मतदानाच्या चार टप्प्यांच्या अखेरीस, मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला पाडणे इंडिया आघाडीला कठीण नाही, असा मला विश्वास आहे. आमच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. काही दशकांपूर्वी मोरारजी देसाई यांची पंतप्रधानपदी निवड झाली तेव्हा खासदारांच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी नवीन सरकार स्थापनेसाठी पुढाकार घेतला होता, याकडे शरद पवारांनी लक्ष वेधलं.