यापुढील काळात जागतिक स्तरावर शीतयुद्धापेक्षाही भयानक उलथापालथ व तणावाची स्थिती निर्माण होणार असून, त्यास तोंड देण्यासाठी भारताचे नेतृत्त्व नरेंद्र मोदी यांच्यासारख्या कणखर नेतृत्त्वाकडेच हवे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या सभागृहात प्रसारमाध्यमांच्या संपादकांशी झालेल्या वार्तालापात त्यांनी वरील घटनेचा वृत्तांत दिला. ‘खारकीव्ह शहरात पहिल्यांदा घटना घडली, तेव्हा आम्ही तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना विशिष्ट ठिकाणी जमण्यास सांगितले होते. ते निघणार तेवढ्यात काही गैरसमजुतीतून रशियन फौजांकडून गोळीबार सुरू झाला. त्या वेळी पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांच्याशी संपर्क साधून सुरक्षित झोन निश्चित करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. पुतिन यांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले व दोन तासांत गोळीबार थांबला होता.’ असे एस. जयशंकर यांनी सांगितले.
सुमी शहरात घडलेली दुसरी घटना अधिक मोठी होती. ही जागा युद्धभूमीच्या जवळ होती. आम्ही बस पाठविल्या. मात्र, विद्यार्थी बसमध्ये बसताच गोळीबार सुरू झाला. विद्यार्थी घाबरले. आम्ही दोन रशियन मदतनीस पाठवले; परंतु पूर्ण मार्ग सुरक्षित करायचा होता. त्या वेळी मोदी यांनी पुतिन व झिल्येन्स्की या दोघांना फोनद्वारे विनंती केली. मी या फोनचा साक्षीदार होतो,’ असे जयशंकर म्हणाले. तुमचा मुलगा युक्रेनमध्ये असता, तर त्याला परत आणण्यासाठी कुणावर भरवसा केला असता, कुणामध्ये ती क्षमता आहे, हिंमत आहे आणि समज आहे, हे आता भारतातील जनतेने जाणले आहे,’ असे जयशंकर यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
‘चीनच्या हडेलहप्पीस नेहरू कारणीभूत’
‘चीनकडून भारताच्या जमिनीवर होणाऱ्या सर्व बांधकामांना पंडित जवाहरलाल नेहरूच कारणीभूत आहेत. चीनकडून ज्या जमिनीवर बांधकामे होत आहेत, तो सर्व भूभाग १९५८ ते १९६२ दरम्यान नेहरूंच्या चुकीमुळे चीनच्या ताब्यात गेलेला आहे,’ अशी टीका परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली.