सदर परीक्षा सुधारित दिनांकास म्हणजेच शनिवार ०६ जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेमधून भरावयाच्या विविध संवर्गातील एकूण ५२४ पदांचा सुधारित तपशील खालीलप्रमाणे
- अर्ज सादर करण्याचा कालावधी-०९ मे २०२४ च्या १४.०० ते तारीख २४ मे २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
- ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तारीख- २४ मे २०२४ रोजी २३:५९ पर्यंत
- भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा अंतिम तारीख 26 मे 2024च्या २३:५९ पर्यंत
- चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम तारीख- २७ मे २०२४ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये
पदे व संख्या
(एक) राज्य सेवा परीक्षा :- एकूण पदे 431
(1) उप जिल्हाधिकारी, गट-अ (एकूण 07 पदे)
(2) सहाय्यक राज्य कर आयुक्त, गट-अ (एकूण 116 पदे)
(3) गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी),गट-अ (एकूण 52 पदे)
(4) सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ (एकूण 43 पदे)
(5) सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक अदिवासी विकास प्रकल्प)(श्रेणी दोन), गट-अ (एकूण 03 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे)
(6) उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ (एकूण 07 पदे)
(7) सहायक कामगार आयुक्त, गट – अ (एकूण 02 पदे)
(8) सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, गट – अ (एकूण 01 पद)
(9) मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी, गट-ब (एकूण 19 पदे)
(10) सहायक गट विकास अधिकारी, गट-ब (एकूण 25 पदे)
(11) सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 1 पदे)
(12) उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-ब (एकूण 5 पदे)
(13) कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता-मार्गदर्शन अधिकारी, गट-ब (एकूण 07 पदे)
(14) सरकारी कामगार अधिकारी, गट – ब (एकूण 04 पदे)
(15) सहायक प्रकल्प अधिकारी/ सांख्यिकी अधिकारी/ प्रशासकीय अधिकारी/ संशोधन अधिकारी / गृहप्रमुख /प्रबंधक, गट-ब (एकूण 04 पदे)
(16) उद्योग अधिकारी (तांत्रिक), गट-ब (एकूण 7 पदे)
(17) सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), आदिवासी विकास आयुक्तालय, गट-ब (एकूण 52 पदे)
(18) निरीक्षण अधिकारी (पुरवठा), गट-ब (एकूण 76 पदे)
(दोन ) महाराष्ट्र वनसेवा परीक्षा – महसूल व वन विभाग (एकूण48 पदे)
(1) सहायक वनसंरक्षक, गट-अ, (एकूण 32 पदे)
(2) वनक्षेत्रपाल, गट-ब, (एकूण 16 पदे)
(तीन ) महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा – मृद व जल संधारण विभाग (एकूण 45 पदे)
(1) उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-अ, (एकूण 23 पदे)
(2) जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब, (एकूण 22 पदे)
यासंदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आयोगाने म्हटले आहे.