मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा, मेगाब्लॉकविषयी अपडेट्स जाणून घ्या

प्रतिनिधी, मुंबई : ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर, त्याचबरोबर पनवेल ते वाशी या दरम्यान मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेने बोरिवली ते राम मंदिरादरम्यान रविवारी ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

स्थानक – ठाणे ते कल्याण

मार्ग- पाचवा आणि सहावा

वेळ – सकाळी ९ ते दुपारी १

परिणाम – ब्लॉकवेळेत पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील मेल-एक्स्प्रेस तिसऱ्या आणि चौथ्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे जलद अप-डाउन लोकल फेऱ्यांसह एकूण १८ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांची वाहतूक विलंबाने होणार आहे.
Jalna Accident: विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्टची इर्टीगाला धडक, भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू

हार्बर रेल्वे

स्थानक – पनवेल ते वाशी

मार्ग – अप आणि डाउन

वेळ – सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५

परिणाम – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल / बेलापूर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान धावणाऱ्या अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी-वाशी, ठाणे ते वाशी / नेरूळ, बेलापूर-नेरूळ आणि उरणदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक – बोरिवली ते राम मंदिर

मार्ग – अप आणि डाउन जलद

वेळ – सकाळी १० ते दुपारी ३

परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

मेमू कोपरपर्यंतच

०१३३९ वसई रोड- दिवा सकाळी ०९.५० वाजता वसई रोडवरून कोपरपर्यंत धावणार आहे. कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान ही गाडी रद्द असेल. कोपर येथूनच मेमूचा परतीचा प्रवास सुरू होईल. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.