याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-पुणे द्रुतगती माहामार्गवर आज पहाटेच्या सुमारास पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि तो ट्रक पुढे कोंबड्या घेऊन जाणाऱ्या पिक अप टेम्पोवर जाऊन आदळला. त्यामुळे पुढे चालणाऱ्या ओम्नी गाडीला त्याची जोरात धडक बसली.
या अपघातात ओम्नी कारमधील चालकासह ५ जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे, तर २ जण गंभीर जखमी असून चालक किरकोळ जखमी आहे. तसेच कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोमधील चालकासह ४ जणांपैकी २ गंभीर तर २ जण किरकोळ जखमी आहेत. ट्रकमधील चालकासह तिघांपैकी एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एम जी एम हॉस्पिटल पनवेल आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे. तसेच मृतदेह कारवाईसाठी पुढे पाठविण्यात आले आहेत.
अपघात ठिकाणी मदतीसाठी आय आर बी कडील देवदूत टीम, आय आर बी पेट्रोलींग टीम, मृत्युंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची १०८ ॲम्बुलन्स सेवा यांनी मदतकार्य केले.
महामार्ग वाहतूक पोलीस-बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात झाल्यानंतर काही वेळासाठी वाहतूक बाधित झाली होती मात्र तात्काळ मदतकार्य पूर्ण करून वाहतूक खुली करण्यात आली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली आहे. पोलिसांकडून सध्या वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.