मुंबई मध्ये लोकसभा निवडणूक – २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे, २०२४ रोजी पार पडणार आहे. खरं तर हा लोकशाहीचा उत्सव आहे. मतदार म्हणून मतदान करण्याकरीता या उत्सवात लोकांची भूमिका फार महत्त्वाची आहे.
मतदान प्रक्रियेमध्ये मतदारांचा जागरूकपणे सहभाग वाढावा यासाठी शासनामार्फत सर्व स्तरातून जनजागृती करण्यात येत आहे. सन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
लोकसभा निवडणुक २०२४ मध्ये मतदान करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना प्रोत्साहित करून त्यांच्या मतदानाच्या कर्तृत्वाबाबत जाणीव करून देण्यासाठी, महामुंबई मेट्रो मतदार जागरूकता आणि सहभाग (SVEEP) या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
मुंबई मेट्रोने जास्तीत जास्त नागरिकांनी प्रवास करावा या दृष्टीने महामुंबई मेट्रो प्रयत्नशील आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करता येईल आणि त्यांना केंद्रापर्यंत आरामदायक प्रवास करता येणार आहे.