मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशातील ४९ मतदारसंघात मतदान पार पडले. यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघांचा समावेश होता. ज्यातील अधिकतर मुंबई शहर आणि उपनगरातील मतदारसंघांचा समावेश होता. मतदान सुरू असताना मुंबईतील एका केंद्रावर पोलिंग एजंटचे निधन झाले.
वरळी विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटातील एका कार्यकर्त्याचा मतदान केंद्रावर मृत्यू झाला. मनोहर नलगे असे या कार्यकर्त्याचे नाव असून त्यांचे वय ६२ होते. डिलाय रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० येोथील म्हस्कर उद्यानात ठाकरे गटाचा पुलिंग बुध होता. उन्हामुळे नलगे यांना त्रास झाला आणि त्याचे निधन झाले. नलगे यांना त्रास होऊ लागल्याने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मुंबईतील वरळी येथे पोलिंग एजंटचा मृत्यू; ठाकरे गटाच्या ६२ वर्षीय कार्यकर्त्याचे निधन, निवडणूक आयोगाकडून योग्य ती व्यवस्था केली नसल्याचा आरोप
