मुंबईकरांसाठी लोकल मेगाब्लॉक अपडेट, उद्या ‘या’ मार्गावर तीन तासांचा ब्लॉक; वाचा वेळापत्रक

प्रतिनिधी, मुंबई : ठाणे ते कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वांद्रे-चुनाभट्टीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकच्या वेळेत रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वसई रोड यार्डमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर पायाभूत सुविधा उभारण्याचे काम करण्यासाठी तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)

स्थानक- ठाणे ते कल्याण

मार्ग- अप आणि डाउन धीमा

वेळ- सकाळी ११ ते दुपारी ४

परिणाम- ब्लॉक कालावधीत ठाणे ते कल्याणदरम्यान धीम्या मार्गावरील अप-डाउन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल २५ मिनिटे विलंबाने धावतील.
पावसाळ्यात सर्वसामान्यांचा लोकल प्रवास सुलभ होणार, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय; जाणून घ्या

हार्बर रेल्वे

स्थानक- सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे

मार्ग- अप आणि डाउन

वेळ- सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०

परिणाम- ब्लॉक कालावधीत सीएसएमटी/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी आणि सीएसएमटी ते वांद्रे/ गोरेगावसाठी धावणाऱ्या अप-डाउन लोकल बंद राहणार आहेत. फलाट क्रमांक ८ वरून पनवेल ते कुर्ल्यादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक- वसई रोड

मार्ग- अप आणि डाउन दिवा

वेळ- शनिवारी मध्यरात्री १२.१५ ते रविवारी पहाटे ३.१५

परिणाम- वसई रोड यार्डातील रात्रकालीन ब्लॉकमुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.