मुंबई : मध्य रेल्वेने माटुंगा ते मुलुंड आणि कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी ब्लॉक घोषित केला आहे. या वेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेमार्गांवर कोणताही ब्लॉक असणार नाही, असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
स्थानक : माटुंगा ते मुलुंड
मार्ग : अप-डाऊन जलद
वेळ : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५
परिणाम : ब्लॉकवेळेत जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द, तर काही २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे
स्थानक : कुर्ला ते वाशी
मार्ग : अप आणि डाऊन
वेळ : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम : सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.