मध्य रेल्वे
स्थानक – ठाणे ते दिवा
मार्ग – पाचवा आणि सहावा
वेळ – सकाळी १०.५० ते दुपारी ३.२०
परिणाम – ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे जलद आणि धीम्या मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून, १८ अप-डाउन मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावणार आहेत.
आषाढी यात्रेसाठी गाड्या
मध्य रेल्वेने आषाढी यात्रेसाठी ६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेकडून या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे विठ्ठू भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हार्बर रेल्वे
स्थानक – कुर्ला ते वाशी
मार्ग- अप आणि डाऊन
वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
परिणाम – सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर/वाशीदरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
पश्चिम रेल्वे
स्थानक – वसई रोड ते विरार
मार्ग – अप आणि डाऊन धीमा
वेळ – शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.१५ ते रविवारी पहाटे ४.१५
परिणाम – ब्लॉक वेळेत रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. धीम्या मार्गावरील काही लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.