मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही…, वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्यमंत्री थेट बोलले

मुंबई : पुणे, जळगाव, नागपुरातील हिट अँड रनची प्रकरणं ताजी असताना वरळीत रविवारी हिट अँड रनचं प्रकरण घडलं. वरळीत सकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास मासे खरेदीनंतर आपल्या घरी जात असलेल्या एका पती-पत्नीला भरधाव कारने उडवलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. पती जखमी झाला. अपघातानंतर कार चालक फरार झाला. महत्त्वाची बाब म्हणजे, पती-पत्नीला धडक देणारी कार शिंदेसेनेच्या उपनेत्याची, राजेश शहा यांची आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
Mumbai Hit and Run: मिहीर शहा देश सोडून पळण्याच्या तयारीत? शेवटचा कॉल कोणाला? पोलिसांना प्रेयसीवर वेगळाच संशय

काय म्हणाले मुख्यमंत्री?

‘महाराष्ट्रात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र असून याबाबत मी अत्यंत चिंतेत आहे. हे असह्य आहे की शक्तिशाली आणि प्रभावशाली लोक त्यांच्या पदाचा गैरवापर करून व्यवस्थेत फेरफार करतात. माझ्या सरकारकडून न्यायाचा असा गैरवापर सहन केला जाणार नाही. सर्वसामान्य नागरिकांचे प्राण आपल्यासाठी अनमोल आहेत. ही प्रकरणं अत्यंत गांभीर्याने हाताळावीत आणि न्याय मिळावा याची खात्री करण्यासाठी मी राज्य पोलीस विभागाला निर्देश दिले आहेत. याव्यतिरिक्त, आम्ही कठोर कायदे आणि हिट अँड-रन गुन्हेगारांसाठी कठोर दंडांची अंमलबजावणी करत आहोत.’
Mumbai Hit and Run: …तर माझी कावेरी वाचली असती हो! पतीचा काळीज पिळवटून टाकणारा टाहो; आक्रोश ऐकून उपस्थित सुन्न
‘मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही, मग तो श्रीमंत असो, प्रभावशाली असो, किंवा नोकरदार किंवा मंत्र्यांची मुलं असो, किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित असो, त्याला प्रतिकारशक्ती मिळणार नाही. मी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. हे स्पष्ट करतो, की माझं प्रशासन पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. सर्व नागरिकांसाठी सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.’

दरम्यान, अपघातावेळी शिंदेसेनेचे उपनेते, राजेश शहा यांच्या मुलगा मिहिर आणि कार चालक बीएमडब्लूमध्ये होते. त्यांनी अपघातानंतर घटनास्थळावरुन पळ काढला होता. आता राजेश शहा यांचा मुलगा मिहिर आणि कार चालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.