मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहिर शहाचा आणखी एक कारनामा उघडकीस आला आहे. शनिवारी रात्री उशिरा म्हणजेच अपघात होण्याच्या काही तासांपूर्वी मिहिर जुहूतील व्हाईस ग्लोबल तापस बारमध्ये गेला होता. इथे त्यानं दारु पिण्यासाठी खोटं ओळखपत्र दाखवलं. पोलीस तपासातून ही बाब उघडकीस आली आहे. २७ वर्षे वय असा उल्लेख असलेलं खोटं ओळखपत्र मिहिरनं बारमध्ये दाखवलं होतं.
मिहिर आणि त्याचे मित्र रात्री सव्वा अकराच्या सुमारास जुहूतील व्हाईस ग्लोबल तापस बार गेले होते. तिथे त्यांनी व्हिस्कीचे १२ मोठे पेग रिचवले. प्रत्येकानं साधारणत: प्रत्येकी ४ पेग घेतले. हे प्रमाण बघता कोणीही किमान ८ तास नशेच्या अमलाखाली राहू शकतो. धक्कादायक बाब म्हणजे हार्ड ड्रिंक पिण्यासाठी मिहिर शहानं बारमध्ये खोटं ओळखपत्र दाखवलं. वयाची पंचविशीही न ओलांडलेल्या मिहिरनं २७ वर्षे असा उल्लेख असलेलं खोटं ओळखपत्र बारमध्ये दाखवलं असल्याची माहिती आता उघड झालेली आहे. बारमध्ये मिहिरसोबत गेलेल्या त्याच्या मित्रांचं वय ३० वर्षांच्या पुढे आहे.
हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी मिहिरचे वडील राजेश शहा आणि अपघातावेळी मिहिरसोबत असलेला त्याचा चालक राजऋषीला अटक केली होती. रविवारी दोघांना अटक करण्यात आली. पण राजेश शहांना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळाला. राजऋषी मात्र अद्याप पोलीस कोठडीत आहे. अपघातानंतर मिहिर फरार झाला. तो शहापुरातील रिसॉर्टमध्ये लपला होता. त्याचा मोबाईल बंद होता. मंगळवारी दुपारी त्याला पोलिसांनी अटक केली. जवळपास ६० तास तो पोलिसांना गुंगारा देत होता.

आता पोलिसांनी मिहिर आणि राजऋषीची समोरासमोर बसवून चौकशी केली. अपघातावेळी मीच कार चालवत होतो. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली अशी कबुली मिहिरनं पोलिसांकडे दिली. मी खूप घाबरलो होतो. त्यामुळे कार थांबवली नव्हती, असं त्यानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी दोन्ही आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी केली. काल रात्री दोघांना घटनास्थळी नेण्यात आलं. तिथे झालेल्या अपघाताचं रिक्रिएशन करण्यात आलं. मिहिरच्या फेसबुक वॉलवर दिशाभूल करणाऱ्या अनेक पोस्ट आढळून आल्या आहेत.