यावेळी भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने मिहीर कोटेचा यांच्या खाजगी कार्यालयाबाहेर उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. महाविकास आघाडीतर्फे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी कोटेचांच्या ऑफिसवर हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
“ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हल्ला केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला करायला शिकवत नाही. संजय दिना पाटील यांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. असा हल्ला सहन केला जाणार नाही. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो” अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
या घटनेनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुलुंड पोलिस ठाण्यात धाव घेतली. घडलेल्या प्रकारची माहिती परिमंडळ ७ चे पोलीस उपायुक्त यांच्याकडून घेतली. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दानवेंनी या प्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागत असल्याचा आरोप केला. तसेच पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी गृहमंत्री आले होते, असा दावाही अंबादास दानवेंनी केला