मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. आरोपी मिहीर शहा अपघाताच्या काही तास आधी एका बारमध्ये गेला होता. तिथं तो मित्रांसोबत बियर प्यायला. मिहीर मर्सिडीज कारमधून बारमध्ये पोहोचला होता. याच कारमधून तो निघून गेला. पण अपघातावेळी मिहीर बीएमडब्ल्यू चालवत होता. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे.
बारमध्ये जाताना मिहीर मर्सिडीजमध्ये होता. मग अपघातावेळी त्याच्याकडे बीएमडब्ल्यू कशी आली, याचा शोध पोलीस घेत आहेत. शनिवारी रात्री ११ वाजता मिहीर जुहूतील व्हॉईस ग्लोबल Tapas बारला गेला होता. या बारचे मालक करण शहांनी घटनाक्रम सांगितला होता. ‘आरोपी मर्सिडीज कारनं आला होता. त्याच कारनं तो मित्रांसोबत परत गेला. मिहीरनं मित्रांसोबत बारमध्ये पार्टी केली,’ अशी माहिती करण शहांनी दिली.
‘मिहीर शहा शनिवारी रात्री ११ वाजून ८ मिनिटांनी चार मित्रांसोबत मर्सिडीज कारनं बारमध्ये आला होता. त्यांच्यासोबत कोणी मुलगी नव्हती. सगळी मुलंच होती. सगळे एक-एक बियर प्यायले. बारमधून सगळे शुद्धीत होते. रात्री १ वाजून ४० मिनिटांनी मिहीर आणि त्याचे मित्र बारमधून निघाले. जाताना ते मर्सिडीजमधून गेले,’ असा घटनाक्रम करण शहांनी कथन केला.
‘मिहीर आणि त्याच्या मित्रांचं बिल १८ हजार ७३० रुपये झालं. पैसे त्याच्या मित्रानं दिले. मिहीरचं ओळखपत्र तपासल्यानंतरच त्याला आत प्रवेश देण्यात आला होता. ओळखपत्रानुसार त्याचं वय २८ वर्षे आहे. चारही मित्र मर्सिडीज कारनं बारमध्ये आले होते. त्याच कारनं ते निघून गेले. पण अपघात बीएमडब्ल्यू कारनं झाला. पोलिसांनी बारमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर तपासला. आम्ही सगळी माहिती पोलिसांना दिली आहे,’ असं करण शहा यांनी सांगितलं.

मिहीर शहा अपघातानंतर फरार झाला आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. त्याचे वडील राजेश शहांना अटक करण्यात आली. ते शिंदेसेनेचे उपनेते आहेत. पालघरमध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व आहे. पालघरमधील शिंदेंचे राईट हँड अशी त्यांची ओळख आहे.