मान्सूनचा जोर वाढणार! पुढील काही तासात जोरदार, हवामानबाबत IMDचा अलर्ट

मुंबई : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण, ठाणे, पालघर, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. समुद्रसपाटीवरील महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. २७ जून ते ३१ जून आणि १ जुलै रोजी कोकण, गोवा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, सातारा येथे पुढील काही दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.पुण्यातील वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, २८ जून म्हणजे आज नैऋत्य मोसमी पावसाने उत्तर अरबी समुद्राचा उर्वरित भाग, गुजरात राज्य, राजस्थानचा आणखी काही भाग, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, पश्चिम उत्तर प्रदेशता आणखी काही भाग, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशचा आणखी काही भाग, उत्तराखंडचा बहुतांश भाग, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाबचा आणखी काही भाग व्यापला आहे.
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेसाठी भाजपची चाचपणी; पंकजा-दानवेंची नावं शर्यतीत, हर्षवर्धन-चित्रा वाघही स्पर्धेत

२८ जून रोजी म्हणजे आज संपूर्ण विदर्भात आणि मराठवाड्याच्या आणि उत्तर भारत, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहर आणि परिसरात आजपासून पुढील काही दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून तुरळक ठिकाणी पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दोन दिवसात मान्सून राज्य व्यापणार

अरबी समुद्रात मान्सून सक्रिय होत असून पुढील दोन दिवस महत्त्वाचे असल्याची माहिती आहे. पुढील दोन दिवसात राज्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरीत आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पुणे, साताऱ्यात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी हकल्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय, विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज मुसळधार पाऊस?

पश्चिम बंगालमध्ये आज, शुक्रवारी मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान शास्र विभागाने वर्तविला आहे. बंगालच्या उपसागराकडून राज्याच्या दक्षिणपूर्व भागात वेगाने वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय राज्याच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.