माझे फोन घेतले नाहीत, ठाकरेंकडे नेतो वाटलं का? भास्कर जाधवांचे टोले, गोगावले म्हणतात, सॉरी…

मुंबई : शिवसेना अखंड असतानाचे सहकारी आणि आता कोकणातले कट्टर विरोधक एकमेकांच्या समोर आले आणि थट्टा मस्करीत अनेक विषयांवर गप्पा झाल्या. ही दोन नेते मंडळी आहेत, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्रिपदाकडे डोळे लावून बसलेले कोकणातील नेते भरतशेठ गोगावले. तर दुसरे नेते आहेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील मुलूखमैदानी तोफ भास्कर जाधव.

विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने गोगावले आणि जाधव परिसरात एकमेकांसमोर आले आणि पत्रकार मंडळींच्या समक्षच दोघांमध्ये हास्यविनोद रंगले. भास्कर जाधव यांनी गोगावलेंच्या कोटावरुन पाय खेचण्याची संधी सोडली नाही, तर भरतशेठनाही फोन न उचलल्याबद्दल जाधवांची माफी मागावी लागली.
Vidhan Parishad : मतांची जुळवाजुळव, विधानपरिषद निवडणुकीत ठाकरे गटाची उडी, बिनविरोध निकालाची शक्यता धूसर

नेमका संवाद काय झाला?

भास्कर जाधव : तुमच्या वाढदिवसा निमित्त एवढे बॅनर लागले होते, एवढे बॅनर लागले होते, मी फोन पण केला होता तुम्हाला, पण तुम्ही काही माझा फोन नाही उचललात…
भरतशेठ गोगावले :
सर सॉरी, त्याचं काय झालं… की मी पूर्ण त्या बिझी शेड्युलमध्ये असेन…
भास्कर जाधव : तुम्हाला संशय आला असेल…
भरतशेठ गोगावले : नाही नाही नाही…
भास्कर जाधव : भास्कर राव उद्धव साहेबांच्या कडे तुम्हाला घेऊन जातील, म्हणून तुम्ही माझा फोन नसेल उचललात…
भरतशेठ गोगावले : असं नाहीये.. तुम्हाला माहिती आहे… आम्ही काय घाबरणारी मंडळी आहोत का? आता बोलले.. आमचं काही नाही.. मनामध्ये काही हे नसेल, त्याला काय अडचण आहे.
Vidhan Sabha : लोकसभेचा धसका, विधानसभेआधी मस्का, बजेटमधील घोषणांवरुन मविआ नेत्यांचं ‘पायरी’ दाखवत आंदोलन
हा संवाद संपत असतानाच काही पत्रकार तिथे आले…
भास्कर जाधव : (भरत गोगावलेंच्या कोटाकडे पाहून) हे काय कॉम्बिनेशन आहे?
भरतशेठ गोगावले : काहीतरी वेगळं आहे… लोकांचं लक्ष वेधायला पाहिजे ना.. मग काय

(पत्रकारांनी संवादात एन्ट्री घेतली)
पत्रकार : नवीन कोट का?
भरतशेठ गोगावले : अजून आहेत.. काही काळजी नको
पत्रकार : लिलाव करायला लागेल म्हणतात…
भरतशेठ गोगावले : अरे, लिलाव नाही करत, आम्ही गरीबांना देऊन टाकतो